मुंबई : काँग्रसेचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सभा आज मुंबई होणार आहे. राहुल गांधीची सभाही आज (१७ मार्च) सायंकाळी पाच वाजता दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. या सभेसाठी इंडियातील मोठ्या आणि घटक पक्षांना देखील काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आले आहे. यासभेला माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थितीत राहणार आहेत. या सभेतून इंडिया आघाडीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नाराळ फोडणार आहेत. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेसचे निमंत्रण आंबेडकरांनी स्वीकारल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर इंडियाची पहिलीच सभाही मुंबईत होणार आहे. या सभेसाठी हजारोच्या संख्येने इंडियाचे कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्राही दोन महिन्यापूर्वी मणिपूर येथून सुरू झाली होती. राहुल गांधींनी ६७०० किमी प्रवास करत मुंबईत दाखल झाले असून यात्रेचा आज समारोप होणार आहे. राहुल गांधी मुंबई दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. यानंतर राहुल गांधीची धारावीमध्ये सभा देखील पार पडली. यावेळी प्रियंका गांधी वाड्रा आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोद देखील उपस्थिती होते.
भारता हा प्रेमाचा देश - राहुल गांधी
आज राहुल गांधी दक्षिण मुंबईतील मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान या मार्गावर न्याय संकल्प पदयात्रेतही सहभागी झाले. यावेळी राहुल गांधींनी लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'भारत हा प्रेमाचा देश आहे तर, द्वेष का पसरवला जात आहे? द्वेष पसरवणे इतके सोपे नसावे. भाजप द्वेष पसरवते असे आपण म्हणतो. पण या द्वेषाला आधार असला पाहिजे. तेव्हा मला यात्रेतून समजले की या द्वेषाचा आधार 'अन्याय' आहे. या देशातील गरीब, शेतकरी, दलित, महिला, तरुणांवर रोज अन्याय होत आहे,' असे ते यावेळी म्हणाले.
दिग्गज नेते उपस्थितीत राहणार
यासभेत सोनिया गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला, ज्येष्ठ नेत्या कल्पना सोरेन, आपचे नेते सौरभ भारद्वाज, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे नेते उपस्थित राहणार आहे.