नाराज वर्षा गायकवाडांनी टाळल्या नेत्यांच्या भेटी

दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला हवी होती. मात्र ठाकरे गटाने ही जागा मिळविली आहे. या जागेवर वर्षा गायकवाड यांना संधी मिळाली असती, तर त्यांनी नक्की विजय मिळविला असता, अशीदेखील चर्चा होती. मात्र आता ठाकरे गटाकडे ही जागा आहे.
नाराज वर्षा गायकवाडांनी टाळल्या नेत्यांच्या भेटी

प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. मात्र या जागावाटपावरून आघाडीत विशेषत: काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी अस्वस्थता आहे. मिलिंद देवरा यांच्यासारखे नेते आधीच सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यातच मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यादेखील जागावाटपावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी घरी गेले होते. मात्र त्यांनाही वर्षा गायकवाड भेटल्या नसल्याचे समजते.

महाविकास आघाडीचे जागावाटप आता अंतिम झाले आहे. मुंबईत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नसल्याचे काँग्रेसच्या एका गटाचे म्हणणे आहे. सांगलीतही तेच घडले आहे. दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला हवी होती. मात्र ठाकरे गटाने ही जागा मिळविली आहे. या जागेवर वर्षा गायकवाड यांना संधी मिळाली असती, तर त्यांनी नक्की विजय मिळविला असता, अशीदेखील चर्चा होती. मात्र आता ठाकरे गटाकडे ही जागा आहे.

काँग्रेसमध्ये नाराजीची भावना अनेक दिवसांपासून आहे. मिलिंद देवरा, अशोक चव्हाण अशा दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी कमीपणाची वागणूक मिळत आहे. ठाकरे गटाने मुंबईत चार जागा घेतल्या तर आहेतच पण उमेदवारही परस्पर जाहीर केले आहेत. आघाडी असली तरी काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. यामुळे आता वर्षा गायकवाड या खरोखरच नाराज आहेत का, हे पाहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in