खारघर महाराष्ट्र भूषण सोहळा मृत्यूप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा; नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र

महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यपालांना पत्र लिहीत यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली
खारघर महाराष्ट्र भूषण सोहळा मृत्यूप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा; नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र

नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, त्यानंतर या सोहळ्यासाठी आलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सहन करायला लागला. एवढेच नव्हे तर यामुळे १४ श्री सदस्यांना मृत्यूने गाठले. यावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी या प्रकरणावर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रात म्हणाले की, "कोटी रुपये या सोहळ्यासाठी खर्च करुनही लाखो श्री सदस्यांना रखरखत्या उन्हात तासंतास बसावे लागले. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून साधे छत लावण्याची तसदी राज्य सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नसल्याने उष्माघातामुळे अनेक श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच, यावेळी चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही अनेक प्रसार माध्यमातून येत असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे." अशा भावना त्यांनी यामध्ये व्यक्त केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in