मेट्रो कार शेड प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध,जन आंदोलनाचा भाई जगतापांचा इशारा

केंद्रातील भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस मेट्रो कार शेड प्रकल्प उभारण्याचा हट्ट करत आहेत
मेट्रो कार शेड प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध,जन आंदोलनाचा भाई जगतापांचा इशारा

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कार शेड प्रकल्प गोरेगाव येथील आरे येथेच होणार, अशी घोषणा केली आहे. या आरेतील मेट्रो कार शेड प्रकल्पाला मुंबई काँग्रेसचा विरोध असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हट्ट न सोडल्यास जन आंदोलनाचा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला आहे.

आरेतील जंगल हे मुंबईचा श्वास आहे. मुंबईचे फुफुस आहे. हे जंगल नष्ट करून यातील झाडे कापून केंद्रातील भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस मेट्रो कार शेड प्रकल्प उभारण्याचा हट्ट करत आहेत. पर्यावरणाचा नाश करणारा हा प्रकल्प आहे. सर्व स्तरातून याला विरोध होत आहे. मुंबईकरांनासुद्धा हा प्रकल्प आरेमध्ये नको आहे. कांजूरमार्ग येथे याच प्रकल्पासाठी जागा प्रस्तावित केलेली आहे. कांजूरमार्ग येथेच मेट्रो कार शेड प्रकल्प उभा राहिला पाहिजे. परंतु देवेंद्र फडणवीस हे आरेमध्येच हा प्रकल्प उभारण्याचा "बाल हट्ट" करत आहेत, तशी त्यांनी घोषणाही केली. त्यांनी हा "बाल हट्ट" सोडावा, अन्यथा मुंबई काँग्रेस आरेतील मेट्रो कार शेड प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in