आरेतील नागरी सुविधांसाठी काँग्रेसचे १९ जुलैला आंदोलन

अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
आरेतील नागरी सुविधांसाठी काँग्रेसचे १९ जुलैला आंदोलन

मुंबई : आरेमधील रस्त्यांची दुरावस्था, वीज, पाणी आदी स्थानिक प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक झाली आहे. याबाबत येत्या १९ जुलै रोजी काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम, माजी उपमहापौर राजेश शर्मा, उत्तर पश्चिम जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष क्लाईव डायस आदी सहभागी होणार आहेत. माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली नुकताच आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता; मात्र आंदोलनानंतर आरेचे सीईओ आणि दुग्धविकास विभागाने समस्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे कॉंग्रेसने संताप व्यक्त केला आहे. मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे, मागासवर्गीय विभाग मुंबई काँग्रेसचे महासचिव जयराम मुरगन, ब्लॉक अध्यक्ष राहुल उगले, ब्लॉक अध्यक्ष सूरज गुप्ता, स्थानिक आरेतील रहिवासी सुरेंद्र सिंह, हिरालाल सिंह, सुरेश चौधरी, बरकत शेख आदी उपोषणालाही बसणार असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in