Sudhir Tambe : काँग्रेसने केली सुधीर तांबेंच्या तात्पुरते निलंबन; सुधीर तांबे म्हणाले, भूमिका...

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या निर्णयाविरुद्ध सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी त्यांच्या मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली होती
Sudhir Tambe : काँग्रेसने केली सुधीर तांबेंच्या तात्पुरते निलंबन; सुधीर तांबे म्हणाले, भूमिका...

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांची उमेदवार म्हणून निवड केली होती. असे असतानाही त्यांनी पक्षाचा निर्णय डावलून स्वतःचा मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवार म्हणून फॉर्म भरला. तोही अपक्ष म्हणून फॉर्म भरल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावरून आता काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांचे तात्पुरते निलंबन केले आहे. विशेष म्हणजे, पक्षाने काढलेल्या पत्रामध्ये असे म्हंटले आहे की, चौकशी होईपर्यंत सुधीर तांबे यांना निलंबित करण्यात येत आहे. या पत्रामध्ये कुठेही सत्यजित तांबे यांचा उल्लेख नाही.

काँग्रेस पक्षाने केलेल्या कारवाईवर सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, "काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे." असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे यांच्याबाबत पक्षाने कोणतेही कारवाईचे आदेश दिलेले नाहीत. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच, 'सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळणार नाही.' असे स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in