प्रवाशांच्या सोयीसाठी १५६ उन्हाळी स्पेशल गाड्या; अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वेने उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५६ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी १५६ उन्हाळी स्पेशल गाड्या; अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टीत अनेक जणांनी गावी जाण्याची तयारी केली आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १५६ उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वेने उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५६ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०५३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ एप्रिल ते २६ जून रोजी दर बुधवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता बनारस येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१०५४ साप्ताहिक विशेष गाडी ४ एप्रिल ते २७ जून रोजी दर गुरुवारी बनारस येथून रात्री ८.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या सर्व गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह शनिवार ३० मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू झाल्याचे, मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर

द्वी-साप्ताहिक विशेष

यासोबत लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्वी-साप्ताहिक विशेष गाडीच्या ५२ फेऱ्या धावणार आहेत. यामध्ये ट्रेन क्रमांक ०१४०९ द्वी-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ एप्रिल ते २९ जून रोजी दर सोमवार आणि शनिवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजता दानापूर येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१४१० द्वी-साप्ताहिक विशेष दानापूर २ एप्रिल ते ३० जून रोजी दर मंगळवार आणि रविवारी संध्याकाळी ६.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in