प्रेयसीसोबत भांडणानंतर कॉन्टेबलची आत्महत्या

या दोघांपैकी कोणचे इतरांशी संबंध होते, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रेयसीसोबत भांडणानंतर कॉन्टेबलची आत्महत्या
Published on

मुंबई : प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत रविवारी रात्री घडली आहे.

इंद्रजीत साळुंखे हे कॉन्स्टेबल पोलिसांच्या स्थानिक शस्त्रागारात नियुक्ती होते. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी वरळीत आत्महत्या केली. आपल्या प्रेयसीला अखेरचा मेसेज केल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मी माझे आयुष्य संपवत आहे, असे सांगून त्यांनी गळफास लावून घेतला.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, मृत कॉन्स्टेबल व त्यांच्या प्रेयसीचे रविवारी रात्र भांडण झाले. साळुंखे हे इन्स्टाग्रामवर अन्य महिलेसोबत बोलत होता, या संशयातून दोघांमध्ये भांडण झाल होते. या दोघांपैकी कोणचे इतरांशी संबंध होते, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांना किंवा साळुंखे यांच्या कुटुंबीयांना याबाबत कोणताही संशय आल्यास, प्रेयसी किंवा संबंधित अन्य महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि पुढील कारवाई केली जाईल. तपासणीनंतर साळुंखे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in