पश्चिम रेल्वेच्या खार स्थानकात एलीव्हेटेड डेक, सरकत्या जिन्यांची उभारणी

प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचता यावे यासाठी पश्चिम रेल्वेवरील बहुतांश स्थानकात एलीव्हेटेड डेक, होम प्लॅटफॉर्म याबरोबरच पादचारी पुलासह विविध सुविधांची रेलचेल प्रशासनाकडून करण्यात येत आहे
पश्चिम रेल्वेच्या खार स्थानकात एलीव्हेटेड डेक, सरकत्या जिन्यांची उभारणी

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुविधांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पादचारी पूल, सरकते जिने यांसोबत अलीकडेच खार स्थानकात सध्या एलीव्हेटेड डेकचे काम सुरु आहे. हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील विविध कामांना गती देण्यासाठी एमआरव्हिसीने निविदा काढली असून ती भरण्यासाठी १३ डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत दिली आहे. मार्च २०२४ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.    

प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचता यावे यासाठी पश्चिम रेल्वेवरील बहुतांश स्थानकात एलीव्हेटेड डेक, होम प्लॅटफॉर्म याबरोबरच पादचारी पुलासह विविध सुविधांची रेलचेल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशातच पश्चिम रेल्वेवरील गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाणारे खार स्थानकात पूर्व आणि पश्चिम दिशेहून खार स्थानकात प्रवेश करण्यासाठी पादचारी पुलाशिवाय पर्याय नाही. तसेच स्थानकच्या दोन्ही बाजूला फेरीवाले, वाहनांची गर्दी असून त्यामुळे स्थानकापर्यंत पोहोचणे प्रवाशांना कठीण जाते. अशा खार स्थानकातील प्रवास सुटसुटीत होण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मदतीने एमआरव्हीसीने सुविधांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्रवाशांना विविध सुविधा या स्थानकात देण्यात येणार आहेत. या कामांसाठी ३ नोव्हेंबरला निविदा काढण्यात आल्या होत्या. निविदा भरण्याची १३ डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत आहे.

या सुविधा होणार उपलब्ध - एलीव्हेटेड डेक- पादचारी पूल परस्परांना जोडणे - चार सरकत्या जिन्यांची उभारणी- एक पादचारी पूल- तीन ‌‌उद्वाहक 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in