एमएमआरमध्ये ग्राहक घर खरेदीबाबत आशावादी;कर्ज व अन्य वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता

वाढत्या पॉलिसी दरांमुळे मागील तिमाहीच्या तुलनेत ग्राहक भावना निर्देशांक काहीसा कमी झाला
एमएमआरमध्ये ग्राहक घर खरेदीबाबत आशावादी;कर्ज व अन्य वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
Published on

२०२१च्या अखेरीस उत्तम वेग धरल्यानंतर, हे वर्षही भरभराटीचे जाणार अशी चिन्हे आहेत, कारण जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती प्रतिकूल असूनही गृहग्राहकांमध्ये आशावाद कायम आहे. क्रेडाई-एमसीएचआय व ट्रुबोर्ड पार्टनर्स यांनी प्रसिद्ध केलेल्या हाउस पर्चेस सेंटीमेंट इंडेक्सनुसार (जून २०२२) मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ४७ टक्के संभाव्य गृहग्राहक लवकरात लवकर घर खरेदी करण्याबाबत आशावादी आहेत, कारण कर्ज व अन्य वस्तूंच्या किमती लवकरच वाढणार आहेत असा त्यांचा अंदाज आहे.

ट्रुबोर्ड पार्टनर्सच्या रिअल इस्टेट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम बावीस्कर म्हणाले की, हाऊस पर्चेस सेंटिमेंट इंडेक्स अर्थात घर खरेदी भावना निर्देशांक, आर्थिक वर्ष २३च्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी घसरला आहे पण तरीही स्कोअर ६५.५ म्हणजेच, ५० या निराशावादाच्या सीमेहून बराच वर अर्थात आशावादी आहे. वाढत्या पॉलिसी दरांमुळे मागील तिमाहीच्या तुलनेत ग्राहक भावना निर्देशांक काहीसा कमी झाला असला तरी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३ पैकी २ ग्राहकांना किमतींमध्ये वाढ होईल असे वाटत आहे आणि म्हणूनच पुढील ३-६ महिन्यांत घर खरेदी करायचे हे त्यांनी निश्चित केले आहे. अर्थात, या आशावादात तिमाहीगणिक घट होत असल्यामुळे, पुढील ६ महिने संभाव्यतेचे रूपांतर विक्रीत होत राहील; पण वाढती चलनवाढ व रेपोदरांमध्ये सातत्यपूर्ण वाढ यांमुळे आर्थिक वर्ष २०२२च्या दमदार दुसऱ्या सहामाहीतील कामगिरी ओलांडणे कदाचित शक्य होणार नाही.

क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इरानी म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीतही उद्योगक्षेत्रात किती स्थितीस्थापकत्व आहे, यावर हाउस पर्चेस सेंटिमेंट इंडेक्समधून प्रकाश टाकला गेला आहे. अपेक्षित दरवाढ व वाढीव तारण दरांसारखे निर्बंध येऊनही, अर्थव्यवस्थेतील सुधारणा व भविष्यकाळात अधिक चांगल्या उत्पन्नाची संभाव्यता यांमुळे गृहग्राहकांमधील आशावाद कायम आहे. एमएमआरमधील विविध भागांमधील मते वेगवेगळी आहेत असे निर्देशांकावरून दिसते. पूर्व उपनगरांमधील ग्राहक हे येत्या ३-६ महिन्यांत घर खरेदी करण्याबाबत बहुतांशी आशावादी आहेत, तर दक्षिण मुंबईतील ग्राहकांचा पवित्रा काहीसा सावध आहे.

logo
marathi.freepressjournal.in