
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटी झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे या काही वेळासाठी या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात सांयंकाळी साडेबाच वाजेच्या सुमारास झाल्याची माहिती वाहतूकपोलिसांनी दिली आहे.
आज(७ ऑगस्ट) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटी झाला. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतुक काही काळ ठप्प झाली. कंटेनर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पडला. याचा परिणाम पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर झाला आणि वाहतूक बंद पडली. यानंतर पलटी झालेल्या कंटेनर बाजुला घेण्यात आला. आता वाहतुक सुरळीत झाली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.