रस्त्यांवरील खड्ड्यांना कंत्राटदार जबाबदार

९१२ रस्त्यांपैकी ३९ कामे पूर्ण; पी वेलरासू यांची माहिती
रस्त्यांवरील खड्ड्यांना कंत्राटदार जबाबदार

मुंबई : खड्डेमुक्तीसाठी सिमेंट कॉँक्रीटचे ४०० किलोमीटरचे रस्ते करण्याचे कामे हाती घेण्यात येणार आहे. एकूण ९१२ रस्ते सिमेंट कॉँक्रीटचे होणार असून, सद्यस्थितीत ८६ रस्त्यांची कामे सुरू असून, ३९ सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित सिमेंट कॉँक्रीट रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरू होतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. दरम्यान, सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांची जबाबदारी तीन वर्षांसाठी ५ कंत्राटदारांची असून, तीन वर्षांत खड्डे पडल्यास कंत्राटदार जबाबदार असेल, असा इशारा पी वेलरासू यांनी दिला.

मुंबई खड्डेमुक्तीसाठी मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉँक्रीटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना दिले होते. चहल यांनी पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील आणि संपूर्ण रस्ते सिमेंट कॉँक्रीटचे असतील, अशी ग्वाही दिली आहे.

उर्वरित कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात

मुंबईत सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते करण्यासाठी पाच कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ९१२ रस्त्यांची कामे होणार असून, आतापर्यंत ३९ काम पूर्ण झाले आहे; मात्र पावसाळ्यात सिमेंट कॉँक्रीटचे रस्त्याचे काम करणे शक्य नसल्याने ऑक्टोबरपासून पुन्हा सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते करण्यास सुरुवात होईल, असेही वेलरासू यांनी सांगितले.

मुंबई शहरात सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांची प्रतीक्षा

मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील एकूण ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉँक्रीटचे होणार आहेत. यासाठी पाच कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र मुंबई शहरात अद्याप सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते कामास सुरुवात झाली नसल्याचे ते म्हणाले.

१० वर्षें खड्डे पडणार नाही याची जबाबदारी कंत्राटदाराची

सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in