कंत्राटदार, विकासकांना काम थांबवण्याचा इशारा,५८ बांधकाम ठिकाणी नियमावलीचे तातडीने पालन

आतापर्यंत ८९१ बांधकाम ठिकाणी स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यापैकी ५८ बांधकाम ठिकाणी तातडीने नियमावलीचे पालन केल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कंत्राटदार, विकासकांना काम थांबवण्याचा इशारा,५८ बांधकाम ठिकाणी नियमावलीचे तातडीने पालन

मुंबई : प्रदूषण रोखण्यासह धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक केले. यासाठी बांधकाम ठिकाणी आधी समज, नंतर कारणे दाखवा नोटीस आणि त्यानंतर ही दुर्लक्ष, तर स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८९१ बांधकाम ठिकाणी स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यापैकी ५८ बांधकाम ठिकाणी तातडीने नियमावलीचे पालन केल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत विविध प्राधिकरणाची सहा हजार बांधकामे सुरू आहेत; मात्र वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. यात बांधकाम ठिकाणी ३५ फूट उंच भिंत बांधणे स्प्रिकलर बसवणे धुळीचे कण पसरू नये यासाठी पडदे लावणे, पाण्याची फवारणी करणे अशी नियमावली जारी केली. तसेच पालिकेने ३ नोव्हेंबरपासून स्कॉडच्या माध्यमातून सर्व वॉर्डमध्ये पालिकेने तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. या सर्व बांधकामांना ऑनलाईन नोटीस बजावून धूळ प्रतिबंधक उपायोजना करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर कार्यवाही केली नसल्याने ६१० बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती.

मात्र काही ठिकाणी यानंतरही कार्यवाही होत नसल्याने ८९१ प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीस दिली. स्टॉप वर्क नोटीस बजावल्यानंतर ५८ बांधकाम नियमांचे पालन करण्यास सुरुवात केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in