शाळेत लाऊड स्पीकरवर अजान लावल्याने वाद; पालकांमध्ये संताप, मुंबईतील प्रकार

यावेळी शाळेने अशाप्रकारे लाऊड स्पीकरवर अजान यापुढे लावू नये असं लेखी पत्र देण्यात आलं
शाळेत लाऊड स्पीकरवर अजान लावल्याने वाद; पालकांमध्ये संताप, मुंबईतील प्रकार

मुंबईतील कांदिवली भागातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये आज सकाळी प्रार्थनेनंतर अजान लावल्याने नवा वाद उफाळून आला. यावर काही पालकांनी आक्षेप नोंदवला असून शिवसेनेने या शाळेविरोधात पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी शाळेने अशाप्रकारे लाऊड स्पीकरवर अजान यापुढे लावू नये असं लेखी पत्र देण्यात आलं. ज्या शिक्षिकेने अजान लावली होती, तिला निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली आहे.

या वादावर शाळेने आपली बाजू मांडली आहे. शाळेच्या म्हणण्यानुसार, "आमच्या शाळेत सर्व धमाच्या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजाव्या म्हणून त्या लाऊड स्पीकरवर लावतो. त्यात गायत्री मंत्र असेल, कॅरोल सिंगिंग किंवा इतर धर्माच्या प्रार्थना असतील. विद्यार्थ्यांना समजण्यासाठी हा उपक्रम असतो. यामध्ये आज लाऊड स्पीकरवर अजान लावण्यात आली. मात्र, पालकांच्या भावना लक्षात घेता आम्ही अजान बंद केली. आम्ही पालकांचा म्हणणं ऐकून घेत आहोत. आता यापुढे आम्ही शाळेत अजान लावणार नाही, असं आम्ही सर्वांना आश्वासन देत आहोत." असं शाळेने म्हटलं आहे.

यावेळी पालकांनी शिक्षकांवर आरोप केला आहे. शाळेत अजान लावणारे शिक्षक अल्पसंख्यांक असल्याने जाणीवपूर्वक त्याचं नाव समोर आणलेलं नाही. असं म्हणतं संबंधित शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी तसंच कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याला समोर आणूण माफी मागायला सांगा आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही असं आश्वासन द्या. अशी मागणी देखील पालकांनी यावेळी केली. यावेळी खबरदारी म्हणून शाळेत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यात महिला पोलिसांचा देखील समावेश होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in