पारंपरिक क्रीडा महाकुंभ (मल्लखांब)- शिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमीला जेतेपद

या स्पर्धेत बुधवारी मल्लखांब प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वांद्रे ते विलेपार्लेतील सांघिक विभागात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने विजेतेपद काबिज केले.
पारंपरिक क्रीडा महाकुंभ (मल्लखांब)- शिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमीला जेतेपद

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी मल्लखांब प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वांद्रे ते विलेपार्लेतील सांघिक विभागात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने विजेतेपद काबिज केले.

१७ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या गटात साने गुरुजी आरोग्य मंदिर, पार्लेश्वर व्यायाम शाळा यांनी पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात पार्लेश्वर व्यायाम शाळा, साने गुरुजी आरोग्य मंदिर प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.

मुंबई उपनगर जिल्ह्याची मल्लखांब स्पर्धा समता क्रीडा भवन कांदिवली पश्चिम येथे पार पडली. ही स्पर्धा चार विभागात घेण्यात आली. सदर स्पर्धेत २८ संघांचा समावेश होता व २५० खेळाडूंनी भाग घेतला होता. दहिसर ते मालाड विभागात सांघिक विजेतेपद प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन, राहुल इन्स्टिट्यूट व समता क्रीडा भवन यांनी, तर मुलींच्या गटात समता क्रीडा भवन, सुविद्यालय यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

अंधेरी ते गोरेगाव विभागात सांघिक विजेतेपद प्रकारात १४ व १९ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात गोरेगाव जिमखान्याने विजेतेपद मिळवले. १४ व १९ वर्षाखालील मुली गटातसुध्दा गोरेगाव जिमखान्याने विजेतेपद मिळवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in