पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर आता एक्स्प्रेसमध्ये

पर्यायी व्यवस्था न करता या पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे
पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर आता एक्स्प्रेसमध्ये

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासूनची पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर मध्य रेल्वेकडून बंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी-भुसावळ दरम्यान मेमू गाडीद्वारे चालवली जात आहे. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्थानकांवर थेट प्रवास करणे अशक्य झाले आहे. परिणामी, प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत-लोणावळा दरम्यान लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे. दरम्यान, त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी थांबा गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in