राजकीय संकट सुरु असताना या प्रमुख नेत्यांना झाला कोरोना

पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला त्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह होती
राजकीय संकट सुरु असताना या प्रमुख नेत्यांना झाला कोरोना

उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी स्वत:च सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. “मी, काल कोरोना चाचणी केली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून, मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली तपासणी करून घ्यावी,” असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांपाठोपाठ मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनीही स्वतः ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. ‘‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.’’ असे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यात राजकीय संकट निर्माण झाल्यानंतर तीन प्रमुखांना कोरोना झाला आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला त्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह होती; मात्र आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेदेखील पॉझिटिव्ह झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे बरी असून ते राजभवनलाही परतले आहेत; मात्र आता राजकीय धामधुमीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना झाल्याने आता ते किमान तीन ते चार दिवस तरी कोणाला भेटू शकणार नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in