राज्यात आणखी दोघांचा मृत्यू; राज्यात कोरोनाचे दिवसभरात ६६० तर मुंबईत २६६ नवे रुग्ण

मुंबईत दिवसभरात २६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्येत घट झाली असली, तरी कोरोनाची धास्ती कायम आहे.
राज्यात आणखी दोघांचा मृत्यू; राज्यात कोरोनाचे दिवसभरात ६६० तर मुंबईत २६६ नवे रुग्ण
Published on

मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढउतार सुरू असून, शनिवारी राज्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मुंबईत दिवसभरात २६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्येत घट झाली असली, तरी कोरोनाची धास्ती कायम आहे.

शनिवारी राज्यात ६६० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ५५ हजार १८९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४७७ वर पोहोचली आहे, तर राज्यात शनिवारी ५३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने राज्यात आतापर्यंत ८० लाख ६६५ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात सध्या ६ हजार ४७ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी २६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६० हजार ३०९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७५३ वर स्थिरावली आहे, तर दिवसभरात २०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत ११ लाख ३८ हजार ९१४ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १,७०२ सक्रिय रुग्ण आहेत.

विमानतळावर दोन बाधित

मुंबई, पुणे व नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी दोन बाधित रुग्ण आढळल्याने विमानतळावर आतापर्यंत ७३ रुग्ण आढळले आहेत. या सगळ्या बाधित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संशोधन संस्था व कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in