कोरोनाबाधितांना क्षय रोगाचा धोका वाढला; ५० लाख जणांची तपासणी करणार

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. मार्च २०२० ते आतापर्यंत कोरोनाच्या चार लाटा मुंबईत धडकल्या
कोरोनाबाधितांना क्षय रोगाचा धोका वाढला; ५० लाख जणांची तपासणी करणार

कोरोनावर मात केल्यानंतर बाधित रुग्णांना क्षय रोगाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. २०२५पर्यंत मुंबई टिबी मुक्त करण्याचे उद्दीष्ट असून टीबीच्या संशयीतांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून ५० लाख लोकांची तपासणी करण्यात येणार असून एक लाख मागे साडेतीन हजार संशयीतांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य सेविका, आशा वर्कर्सच्या माध्यमातून टीबीच्या संशयितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. मार्च २०२० ते आतापर्यंत कोरोनाच्या चार लाटा मुंबईत धडकल्या. राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे चारही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले. कोरोनाची चौथी लाट रोखण्यात यश आल्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णांना टीबीची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे टीबीच्या संशयीतांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण सुरु मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत साधारणपणे ९ लाख ८६ हजार घरांमधील ४० लाख ३४ हजार ५१३ इतक्या लोकसंख्येची तपासणी ही सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे केली जाणार आहे. यासाठी २ हजार ८२९ चमू कार्यरत असून हे चमू सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत घरांना भेटी देणार आहेत.

... तर पुन्हा भेट देणार

या प्रत्येक चमूत एक महिला, एक आरोग्य स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक; यानुसार ३ व्यक्तिंचा समावेश असणार आहे. या भेटी दरम्यान एखाद्या घरातील कोणताही सदस्य उपलब्ध नसल्यास, सदर चमू त्या घराला घरातील सदस्यांच्या उपलब्धतेनुसार पुन्हा भेट देणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in