मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच...

महाराष्ट्रात 2,813 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 11,571 झाली
File Photo
File PhotoANI
Published on

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पाहावयास मिळत असून, गुरुवारी 1,702 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 75 हजार 243 वर पोहोचली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 19 हजार 570 वर पोहोचली आहे. गुरुवारी आढळलेल्या 1,702 नवीन रुग्णांपैकी 78 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात 703 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 10 लाख 47 हजार 675 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 7,978 सक्रिय रुग्ण आहेत

logo
marathi.freepressjournal.in