Corona Update : मुंबई महानगरपालिकेने लोकांना 'या' गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले

ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 34 झाली आहे
Corona Update :  मुंबई महानगरपालिकेने लोकांना 'या' गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईतही रुग्णांची संख्या वाढत आहे. आज मुंबईत 274 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 216 रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी 13 रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. मुंबईत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1635 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांची संख्या 13 ने वाढून 121 वर पोहोचली आहे. ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 34 झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने लोकांना या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरणे, हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, घरात एकांतात राहणे. आजारी असल्यास आणि श्वसन रोगाच्या बाबतीत वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in