मुंबईतून कोरोना झाला हद्दपार; दोन वर्षांनंतर गंभीर रुग्णांची शून्य नोंद

पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले
मुंबईतून कोरोना झाला हद्दपार; दोन वर्षांनंतर गंभीर रुग्णांची शून्य नोंद

मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत चार लाटा धडकल्या होत्या. चौथी लाट मे महिन्यात धडकली होती; मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे चौथी लाट रोखण्यात यश आले असून, तब्बल दोन वर्षांनंतर गंभीर रुग्णांची शून्य नोंद झाल्याने मुंबईतून कोरोना हद्दपार झाला आहे. दरम्यान, सद्यस्थितीत ९४८ कोरोनाबाधित असले, तरी ९३ टक्के बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने मुंबईसाठी दिलासादायक चित्र आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले, मात्र जूनअखेर मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढ सुरू झाली होती. मे महिन्यात १२५ पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये थेट दीड हजारांवर गेल्याने पालिकेचे टेन्शन वाढले होते. १५ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत तब्बल ९ हजार ४९५ रुग्ण वाढले होते; मात्र गणेशोत्सवानंतर मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ खाली येत गेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in