एशियन गेम्स स्पर्धात चीनमध्ये कोरोनाचे वाढते संकट

एशियन गेम्स स्पर्धात चीनमध्ये कोरोनाचे वाढते संकट

चीनमध्ये 'हॅगझोवू' येथे सप्टेंबरमध्ये होणारी १९ वी एशियन गेम्स स्पर्धा चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाने एशियन गेम्सच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती पोस्ट केली आहे. १० ते २५ सप्टेंबर दरम्यान एशियन गेम्स स्पधार् होणार होत्या. नव्या तारखा नंतर घोषित केल्या जातील, असेऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाने स्पष्ट केले आहे.

एशियन गेम्स स्पर्धेची जोरदार तयारी सुरु होती. गेम्ससाठीची ५६ ठिकाणे पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनानंतर कोरोना नियंत्रण स्थितीत ही स्पर्धा होईल, अशी आशा होती. मात्र सध्याचे कोरोनाचे संकट पाहता एशियन गेम्स पुढे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने देखील स्पर्धा ठरलेल्या नियोजनानुसार होतील, असे मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे नरेंदर बत्रा यांना देखील आयोजकांकडून हेच सांगण्यात आले होते. अठरावी एशियन स्पर्धा जकार्तामध्ये झाली होती.

दरम्यान, चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला असून २६ शहरांमध्ये लॉकडॉऊन करण्यात आले आहे. हॅंगझोवू हे पूर्व चीनमधील शहर शांघायच्या अगदी जवळ आहे.

logo
marathi.freepressjournal.in