सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थला न्यायालयाचा दिलासा

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थला न्यायालयाचा दिलासा

दिवंगत अभिनेताचा सुशांतसिंग राजपूत संबंधित अंमली पदार्थ प्रकरणातील संशयित आरोपी आणि सुशांतचा फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठानीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

१४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अंमल पदार्थांशी संबंधित बाजू समोर आली. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह अनेक ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली. त्यातच एनसीबीने सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थला त्याच्या सोशल मिडियावरील पोस्टच्या माध्यमातून हैद्राबाद येथून २८ मे रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक केली. अटकेविरोधात सिद्धार्थने विशेष न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात सिद्धार्थने उच्च न्यायालयात अ‍ॅड. अद्वैत ताम्हणकर यांच्यामार्फत अपील दाखल केले होते.

त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. अवैध अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा तपास यंत्रणेकडे नसल्याचा दावा सिद्धार्थच्या वतीने करताना जामीन द्यावा अशी विनंती केली. तर राज्य सरकारच्यावतीने अ‍ॅड श्रीराम सिरसाट यांनी जोरदार विरोध केला. तसेच या प्रकरणातील प्रमुख संशयित पिठाणी हा बर्‍याच दिवसांपासून फरार होता. त्याने राजपूतसोबत फ्लॅट शेअर केला होता आणि राजपूतच्या मृत्यूची दरम्यान तो तिथे होता याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून जामीन मंजूर करू नये, अशी विनंती केली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने सिद्धार्थ पिठानीला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in