मुलाला नैसर्गिक पालकाच्या मायेपासून वंचित ठेवू नये - न्यायालय; अपहरण प्रकरणातील आईला जामीन

७ वर्षांच्या मुलाला नैसर्गिक पालकाच्या मायेपासून वंचित ठेवू नये, असे निरीक्षण मुंबईतील एका न्यायालयाने नोंदवले आहे. २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
मुलाला नैसर्गिक पालकाच्या मायेपासून वंचित ठेवू नये - न्यायालय; अपहरण प्रकरणातील आईला जामीन
Published on

मुंबई : ७ वर्षांच्या मुलाला नैसर्गिक पालकाच्या मायेपासून वंचित ठेवू नये, असे निरीक्षण मुंबईतील एका न्यायालयाने नोंदवले आहे. २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. आरोपी ही ७ वर्षीय मुलीची आई असून तिच्या अटकेपासून तिची मुलगी अंधेरीतील बालगृहात राहत आहे.

हा खटला २०१३ मध्ये सात वर्षांच्या दुसऱ्या एका मुलीच्या अपहरणाशी संबंधित आहे. जवळपास दशकभरानंतर पीडित मुलगी सापडली आणि त्यामुळे २०२२ मध्ये आरोपी महिला व तिच्या पतीला अटक करण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात आरोपी महिलेला जामीन मंजूर करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी निरीक्षण केले की, आरोपीच्या मुलीला मागील तीन वर्षांपासून आपल्या पालकांना भेटता आलेले नाही.

निश्चितच ती ‘बाल भवन’मध्ये आहे, जिथे तिची काळजी घेतली जात आहे आणि संरक्षण दिले जात आहे. परंतु ७ वर्षांच्या मुलीला नैसर्गिक पालकाच्या मायेपासून वंचित ठेवले जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने पुढे नमूद केले की, आरोपी महिला मागील तीन वर्षांपासून तुरुंगात असून मुलीच्या सहवासापासून ती वंचित आहे आणि या काळात खटल्यात काहीही प्रगती झालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in