सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई पोलिसांना ३० आणि ३१ मार्चचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश दिले
सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई : सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या रीट याचिकेवर सुनावणी करताना ३० मार्च रोजी रामनवमी शोभायात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने मालवणी पोलीस ठाण्याला दिले आहेत. मर्चंट यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत मालवणी पोलीस ठाण्याला ३० मार्चचे सीसीटीव्ही फुटेज पुरवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी अन्य काही कारण सांगून फुटेज शेअर करण्यास नकार दिल्याचा आरोप मर्चंटने आपल्या याचिकेत केला आहे. जमील मर्चंटचे वकील बुरहान बुखारी म्हणाले की, न्यायालयाने मुंबई पोलिसांना ३० आणि ३१ मार्चचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in