आरोपींना न्यायालयाचे समन्स ;२५ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

आरोपींना न्यायालयाचे समन्स ;२५ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

न्यायलयाने सर्व आरोपीना समन्स बजावले आहे

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटला अंतिम टप्प्यात आला असून, सर्व साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्याचे काम पूर्ण झाले. याची दाखल घेत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपीना समन्स बजावून २५ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर बाहेर आहेत.

साक्षी नोंदवण्याचे काम पूर्ण

मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए.के लाहोटी यांच्यासमोर हा खटला नियमित सुरू आहे. साक्षीदाराच्या साक्षी नोंदवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आरोपींचा फौजदारी दंड संहितेच्या कलम ३१३ अन्वये जबाब नोंदविण्यासाठी तसेच खटल्यातील पुराव्यांवर म्हणणे मांडण्याची आरोपींना संधी मिळावी म्हणून न्यायलयाने सर्व आरोपीना समन्स बजावले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in