कोविड-१९ पुन्हा डोके वर काढतोय…रूग्णांसाठी पालिका रूग्णालयांमध्ये खाटांची व्यवस्था

जगातील काही देशांमध्ये कोरोना-१९ पुन्हा डोके वर काढू लागला आहे. कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविड १९ ने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. परंतु, प्रशासनाने हे मृत्यू कोरोनाने झाले नसल्याचे म्हंटले आहे. प्रशासनाच्या या दाव्याला ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि अजय चौधरी यांनी कागदपत्रे दाखवून खोडून काढले.
कोविड-१९ पुन्हा डोके वर काढतोय…रूग्णांसाठी पालिका रूग्णालयांमध्ये खाटांची व्यवस्था
Published on

मुंबई : जगातील काही देशांमध्ये कोरोना-१९ पुन्हा डोके वर काढू लागला आहे. कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविड १९ ने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. परंतु, प्रशासनाने हे मृत्यू कोरोनाने झाले नसल्याचे म्हंटले आहे. प्रशासनाच्या या दाव्याला ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि अजय चौधरी यांनी कागदपत्रे दाखवून खोडून काढले. यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

कोविड-१९चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून असल्याचे म्हंटले आहे. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे. परंतु मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत तथापि या बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. राजे एडवर्ड स्मारक (के. ई.एम) रुग्णालयात कोविड बाधित महिला (वय १४) आणि महिला (वय ५४) या दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे रुग्ण मुंबई बाहेरील (सिंधुदुर्ग आणि डोंबिवली) याठिकाणी वास्तव्यास असल्याचेही म्हटले आहे. तसेच यासाठी बृहन्मुंबई महानगर-पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. सेव्हन हिल्स (Seven Hill) रुग्णालयामध्ये २० खाटा (MICU), २० खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी, ६० सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे २ अतिदक्षता (ICU) खाटा व १० खाटांचा वॉर्ड

उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

कोविड - १९ लक्षणे

  • कोविड-१९ च्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.

  • यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात.

  • गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे. तसेच योग्य काळजी घेतल्यास कोविड १९ आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो.

  • विशेषत गंभीर आजार तसेच कमी प्रतिकार शक्ती असलेले रुग्ण उदा. कर्करोग, वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचा आजार, इत्यादी रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या (फॅमिली) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in