कोरोनाचा विळखा; मुंबईसह राज्यात ९ जणांचा मृत्यू तर रुग्ण संख्या हजार पार

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे.
कोरोनाचा विळखा; मुंबईसह राज्यात ९ जणांचा मृत्यू तर रुग्ण संख्या हजार पार

मुंबईसह राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत तिपटीने वाढ होत आहे. राज्यात बुधवारी ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर १,११५ नवीन रुग्णांची नोंद झाली. नऊ जणांपैकी दोन जणांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच कोरोनाचा विस्फोट झाला असून मे महिन्यात रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत होणारी वाढ धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.‌

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असून आता मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. बुधवारी राज्यात ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात आतापर्यंत १ लाख ४८ हजार ४७० वर पोहोचली आहे. तर राज्यात दिवसभरात १,११५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ५२ हजार २९१ वर पोहोचली आहे. दिवसभरात ५६० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७९ लाख ९८ हजार ४०० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात सध्या ५,४२१ सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबईत बुधवारी ३२० नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे टेन्शन कायम आहे. बुधवारी ३२० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ३९ हजार ५४५ वर पोहोचली आहे. तर दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७५२ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या १,५७७ सक्रिय रुग्ण आहेत.

विमानतळावर आणखी एक बाधित

दरम्यान मुंबई, पुणे व नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी एक बाधित रुग्ण आढळल्याने विमानतळावर आतापर्यंत ६९ रुग्ण आढळले आहेत. या सगळ्या बाधित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संशोधन संस्था व कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in