सिमेंट काँक्रीटच्या रसत्याला तडे; रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेचा दावा फोल

२०२२-२३ या वर्षांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला असून यासाठी तब्बल २,२०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार
सिमेंट काँक्रीटच्या रसत्याला तडे; रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेचा दावा फोल

सिमेंट-काँक्रीटचे रस्ते मजबूत व टिकाऊ असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र भांडुप कॉम्प्लेक्स मेन गेट ते अमर नगर दरम्यान सिमेंट काँक्रीटच्या रसत्याला तडे गेले असून दोन महिन्यांपूर्वी खुला करण्यात आलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट दिसून येते.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होते. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्ड मिक्स फेल झाले आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ते सिमेंट-काँक्रीटचे बनवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. २०२२-२३ या वर्षांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला असून यासाठी तब्बल २,२०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र भांडुप कॉम्प्लेक्स पंपिग स्टेशन येथील रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला असून दोन महिन्यांपूर्वी खुला करण्यात आला. मात्र दोन महिन्यांत रस्त्याला तडे गेल्याचे मुलुंड येथील भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी निदर्शनास आणली आहे. या रस्ते कामाची तपासणी करून या ठिकाणी नवीन रस्ता बांधण्याची मागणी कोटेचा यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना पत्राद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in