रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी मोबाइल अॅप तयार करा; रवींद्र चव्हाण यांचे आदेश

रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विभागीय आढावा बैठक घेतली
रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी मोबाइल अॅप तयार करा; रवींद्र चव्हाण यांचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी अद्याप रुजू झालेले नाहीत. काही अधिकारी त्यांच्या सोयीनुसार त्यांना पदस्थापना मिळावी, यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी मोबाइल अॅप तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विभागीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेचाही आढावा घेतला.अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची विहित कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in