वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये २९ नोव्हेंबरपासून आर्टिव्हल आर्ट फेस्टिव्हल

मुंबईतील कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील एक्स्पो सेंटर येथे तब्बल ३५०० कलाकृती रसिकांना एकाच कलादालनात पाहता येणार
वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये २९ नोव्हेंबरपासून आर्टिव्हल आर्ट फेस्टिव्हल
Picasa
Published on

आर्टिव्हल आर्ट फेस्टिव्हल २०१९ या प्रदर्शना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ३०० कलाकारांच्या कलाप्रदर्शनाला २९ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. मुंबईतील कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील एक्स्पो सेंटर येथे तब्बल ३५०० कलाकृती रसिकांना एकाच कलादालनात पाहता येणार आहे. हे प्रदर्शन १ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असून सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत कलाप्रेमींना पाहता येणार आहे.

आर्टिव्हल समूहातर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक अशा भारतातील विविध राज्यांतील कलाकार यात सहभागी झाले आहेत. या प्रत्येक कलाकाराची पार्श्वभूमी तसेच सांस्कृतिक वातावरण भिन्न आहे, ज्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांत, शिल्पातून उमटते. यात टी. वैकुंठम, सुहास रॉय, लक्षमा गौड, रमेश गोरजाला, सीमा कोहली, असे सध्याचे गुणी कलाकारही आहेत. या प्रदर्शनात मांडण्यात येणारी चित्रे ही तैल, एक्रिलिक, जलरंग, चारकोल, पेस्टल्स अशा विविध माध्यमातील आहेत. तर तांबे, लाकूड, मार्बल, दगड अशा माध्यमातील शिल्पेही आहेत. चित्रे तसेच शिल्पांसह येथे म्युरल्स पहायला मिळतील. यात मूर्त, अमूर्त, ऐतिहासिक, निसर्ग, पारंपरिक, ग्रामीण तसेच शहरी जीवन, आदिवासी आणि लोककला अशा विविध प्रकारातील चित्रे, शिल्पे पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनातील कलांद्वारे सध्याची सामाजिक समस्या जसे की शेतकर्‍यांचे दु: ख, लोकसंख्या नियंत्रण, प्रदूषणाचे धोके - पर्यावरण आणि त्यांच्यावरील उपाययोजना, विविध ऐतिहासिक वास्तू व वारसा जपण्याची आणि आधुनिक युगात त्यांचे पावित्र्य जपण्यासाठी जनजागृतीपर चित्रे पाहता येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in