पतधोरण आज जाहीर होणार; महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता

सलग तिसऱ्यांदा व्याजदरवाढीचा धक्का सर्वसामान्यांना बसेल कारण त्यांचा ईएमआय अर्थात मासिक कर्जाचा हप्ता वाढणार आहे.
पतधोरण आज जाहीर होणार; महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची ३ ऑगस्टला सुरु झाली आहे. तीन दिवसांची बैठक शुक्रवार, ५ ऑगस्टला संपणार आहे. या बैठकीतील निर्णय शुक्रवारी जाहीर होणार असून पुन्हा एकदा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँक वाढती महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये २५ ते ३५ टक्का वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. तसे झाल्यास सलग तिसऱ्यांदा व्याजदरवाढीचा धक्का सर्वसामान्यांना बसेल कारण त्यांचा ईएमआय अर्थात मासिक कर्जाचा हप्ता वाढणार आहे.

याआधीही रेपो रेटमध्ये वाढ केल्याने आधी कर्जदारांवर ईएमआयचा बोजा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने दोनदा मिळून रेपो रेटमध्ये ०.९० टक्का व्याजदरात वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा व्याजदर वाढणार का याची चिंता नागरिकांना लागली आहे. कारण ऑगस्टच्या पहिल्या यावेळी आरबीआय रेपो रेटमध्ये २५ ते ३५ बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर करू शकते

एकीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग झाली आहे. जूनमध्ये, किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या टॉलरन्स लेव्हल दोन ते सहा टक्के पाहता त्यापेक्षा ७.०१ टक्के म्हणजे जास्त राहिला.

सद्यस्थितीनुसार आरबीआय ऑगस्ट महिन्यात रेपो दरात २५ ते ५० बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची वाढ होऊ शकते असे बँक ऑफ बडोदाला वाटत आहे. तर एचडीएफसी बँकेच्या मते, रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ शक्य आहे. याआधी दोन चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात ९० बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. सध्या रेपो दर ४.९० टक्के आहे. व्याजदर आणखी वाढल्यास त्याचा फटका अनेक क्षेत्रांना सहन करावा लागू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in