वृद्ध आई-वडिलांना बेघर करणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा

वयोवृद्ध आई-वडिलांना बेघर करून फ्लॅटवर कब्जा करणाऱ्या मोठ्या मुलाविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
वृद्ध आई-वडिलांना बेघर करणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा

मुंबई : वयोवृद्ध आई-वडिलांना बेघर करून फ्लॅटवर कब्जा करणाऱ्या मोठ्या मुलाविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. राजीव प्रेमकुमार ओभान असे या आरोपी मुलाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध शिवीगाळ करून धमकी देणे आणि ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चुन्नाभट्टी येथे प्रेमकुमार ध्यानचंद ओभान (७५), त्यांची पत्नी आशा (६८), लहान मुलगा पंकज व त्याच्या पत्नी आणि नातूसोबत राहत असून, राजीव हा त्यांचा मोठा मुलगा असून, तोदेखील याच परिसरात राहतो. दोन्ही फ्लॅट प्रेमकुमार यांच्या मालकीचे असून, त्यांनी एक फ्लॅट राजीवला दिला होता. १ फेब्रुवारीला राजीव त्यांच्या घरी आला आणि त्याने त्यांच्यासह पत्नी, लहान भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाला घरातून बाहेर काढले.

logo
marathi.freepressjournal.in