ॲँटॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्यासह ८ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील साधना यादव व ह्रषिकेश शर्मा यांनी आरोप केला की, ॲँटॉप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नसीर कुलकर्णी यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली.
पीडितांची बाजू मांडताना वकीलांनी सांगितले की, या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड करण्यात आली. न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशीची मागणी केली. या प्रकरणाची माटुंगा पोलीस विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करावी. या पोलीस ठाण्यातील सात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबत छेडछाड करू नये, असे न्यायालयाने सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नासीर कुलकर्णी यांच्यासह ८ ते १० जणांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
१८ मे रोजी दुपारी दोन वाजता वकील साधना यादव यांना सार्वजनिक प्रसाधनगृहात कोणीतरी डांबून ठेवले. त्याबद्दल यादव यांनी पोलिसांना तक्रार केली. या प्रकरणाची तक्रार द्यायला मी व माझी मैत्रीण ॲँटॉप हिल पोलीस ठाण्यात गेलो. तेथे पोलिसांनी आम्हाला अनेक तास थांबवून ठेवले. तेथे आम्ही दोघांच्या विरोधात तक्रार केली. तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी व अन्य पोलिसांनी मारहाण केली. या प्रकरणाची सुनावणी ३ जुलै रोजी उच्च न्यायालयात होणार आहे.