
खंडणीसाठी धमकी देऊन एका मेट्रो कॉन्ट्रक्टर व्यावसायिकाची सोशल मिडीयावर बदनामी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. प्रमोद सिंग, दिपक बाबर आणि सुनिल सोराडकर अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध कट रचून तोतयागिरी करून खंडणीची मागणी करणे, पैशांचा अपहार करून फसवणूक करणे, धमकी देणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवलीतील रहिवाशी असलेले तक्रारदार मेट्रो कॉन्ट्रक्टर आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची प्रमोद आणि दिपकशी ओळख झाली होती.