शिपाई महिलांवर बलात्कार केल्याच्या बोगस पत्राचा तपास गुन्हे शाखेकडे

नागपाडा मोटार परिवहन विभागाच्या आठ शिपाई महिलांवर त्यांच्याच वरिष्ठांनी केलेल्या बलात्कार केल्याच्या बोगस पत्राचा तपास नागपाडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
शिपाई महिलांवर बलात्कार केल्याच्या बोगस पत्राचा तपास गुन्हे शाखेकडे

मुंबई : नागपाडा मोटार परिवहन विभागाच्या आठ शिपाई महिलांवर त्यांच्याच वरिष्ठांनी केलेल्या बलात्कार केल्याच्या बोगस पत्राचा तपास नागपाडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांतील सर्व कागदपत्रे गुन्हे शाखेला सोपविण्यात आली असून, पत्र पाठविणाऱ्या व्यक्तीच्या अकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागपाडा मोटार परिवहन विभागाात कार्यरत असलेल्या आठ महिला शिपायांवर त्यांच्याच वरिष्ठांनी लैगिंक अत्याचार केल्याचा एक पत्र सोशल मिडीयवर व्हायरल झाले होते. त्यात या महिला पोलिसांनी पोलीस उपायुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस हवालदारांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्‍लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले. काही महिला गरोदर राहिल्या, त्यांना जबदस्तीने गर्भपात करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांचे अश्‍लील व्हिडीओ बनवून नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले होते, असे अनेक गंभीर आरोप पत्रात करण्यात आला होता. या पत्राची प्रत्येक एक प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त गुन्हे, वाहतुक व प्रशासन आणि पोलीस उपायुक्त मोटार परिवहन विभागाला पाठविण्यात आले होते. यासंदर्भातील काही वृत्त काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीदरम्यान या आठही महिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीतून त्यांनी संबंधित पोलिसांवर कुठलेही आरोप केलेले नाही किंवा त्यांच्यावरील बलात्काराबाबत कोणालाही तक्रार केली नसल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in