पॉलिशसाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी गुन्हा

मुंबईत आल्यानंतर एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती
पॉलिशसाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी गुन्हा

मुंबई : पॉलिश करण्यासाठी दिलेल्या सुमारे चार लाख रुपयांच्या ७५ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी मनीरुद्दीन अब्दुल मन्नान अहमद या कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या आरोपी कारागिराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कोलकाताचे रहिवासी असलेले राम दुलाल घोष हे झव्हेरी बाजार येथे राहत असून, त्यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यांपासून मनीरुद्दीन हा दागिने पॉलिश करण्याचे काम करत होता. कामावर रुजू होताच त्याला त्यांनी चार लाख सहा हजार रुपयांचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. ते दागिने घेऊन, त्याच्या सहकाऱ्यांना बाथरुमला जातो असे सांगून मनीरुद्दीन हा कारखान्यातून निघून गेला होता. सायंकाळी हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनी राम घोष हे त्यांच्या कोलकाता येथील गावी गेले होते. मनीरुद्दीन हा तिथेच राहत असल्याने ते त्याच्या गावी गेले होते; मात्र तो तिथे नव्हता. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मनीरुद्दीनविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in