मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

उस्मान मंगरे खान, प्रकाश हरि परमार आणि दिपक डावा वाघेला अशी या तिघांची नावे आहेत
Published on

मुंबई : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका टोळीचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश करून तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली. उस्मान मंगरे खान, प्रकाश हरि परमार आणि दिपक डावा वाघेला अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी २८० चोरीचे मोबाईलसह पाच टँक आणि गुन्ह्यांतील बाईक असा सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २७ सप्टेंबरला शिवडी येथे मोबाईल चोरीची एक घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी शिवडी, नागपाडा आणि शीव परिसरात राहणार्‍या उस्मान खान, प्रकाश परमार आणि दिपक वाघेला या तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान ते तिघेही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in