Mumbai : सीएसएमटीवरून शेवटची लोकल आज रात्री १०.२८ ला

मध्य रेल्वेतर्फे १८ आणि १९ एप्रिल रोजी ठाणे येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ आणि डोंबिवली येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ ए, १ आणि २ च्या अप आणि डाउन धिम्या मार्गाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन धिम्या मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल सीएसएमटी-खोपोली लोकल शनिवारी रात्री २२.२८ सुटणार आहे.
Mumbai : सीएसएमटीवरून शेवटची लोकल आज रात्री १०.२८ ला
Mumbai : सीएसएमटीवरून शेवटची लोकल आज रात्री १०.२८ लाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे १८ आणि १९ एप्रिल रोजी ठाणे येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ आणि डोंबिवली येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ ए, १ आणि २ च्या अप आणि डाउन धिम्या मार्गाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन धिम्या मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल सीएसएमटी-खोपोली लोकल शनिवारी रात्री २२.२८ सुटणार आहे.

रेल्वे ब्लॉकचा कालावधी १९ एप्रिल रोजी १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक विभाग: मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली अप आणि डाऊन धीमा मार्ग.

उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल १८ एप्रिल रोजी रात्रौ २३.२६ ते २३.५२ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या आणि दिनांक १९ एप्रिल रोजी ३.२३ ते ९.५५ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धिम्या लाईन सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

१८ एप्रिल रोजी रात्रौ १०.४९ वाजता परळ येथून सुटणाऱ्या ते दिनांक १९ एप्रिल १२.१२ वाजेपर्यंत तसेच १९ एप्रिल रोजी ४.४५ वाजता विद्याविहार येथून सुटणाऱ्या ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.०५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

या ब्लॉक कालावधीत, १९ एप्रिलला पहाटे ०५.४५ वाजल्यापासून ते सकाळी ०९.५८ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लाईन सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील.

१९ एप्रिल रोजी सकाळी ५.२० ते ९.२० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाउन जलद लाईन सेवा ब्लॉक कालावधीत त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : १९ एप्रिल रोजी हार्बर मार्गावर तसेच पनवेल आणि ठाणे विभागांदरम्यान मेगा ब्लॉक आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

logo
marathi.freepressjournal.in