मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कामानिमित्त १ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे १८ क्रमांकाचा फलाट ८० दिवस बंद राहणार आहे. परिणामी आणि अमरावती-सीएसएमटी बल्लारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत. रेल भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) मार्फत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर पायाभूत कामे व सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामे केली जातील.
मध्य रेल्वेने २६ सप्टेंबरपासून मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. तो १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अंतर्गत देखभाल आणि अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा प्रभावित होत आहेत. मेगा ब्लॉक दरम्यान सायन स्टेशनवर नवीन फूट ओव्हर ब्रिजकरिता गर्डर बसविण्याचे प्रमुख काम सध्या वेगात सुरू आहे.
मध्य मुंबईतील पश्चिम व पूर्व महानगरांना जोडणाऱ्या एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम १२ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. पूल पाडण्याचे तसेच राडारोडा हटवण्याच्या कामासाठी लागणाऱ्या वाहनांचीच तेवढी वर्दळ परिसरात आहे.