ग्राफिक डिझायनरच्या फसवणुप्रकरणी सायबर ठगाला अटक

कमिशन दिले नाही किंवा तिचे गुंतवणुक केलेली रक्कमही परत केली नाही. या घटनेनंतर तिने मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती.
ग्राफिक डिझायनरच्या फसवणुप्रकरणी सायबर ठगाला अटक

मुंबई : ट्रेडिंगच्या नावाने एका २५ वर्षांच्या ग्राफिक डिझायनर तरुणीची ऑनलाईन ३ लाख ३५ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी देवेंदर पिता भुदेव या वॉण्टेड असलेल्या सायबर ठगाला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या टोळीने या तरुणीला सुरुवातीला पार्टटाईम जॉब ऑफर करुन नंतर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. तक्रारदार तरुणी जोगेश्‍वरी येथे राहत असून ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते. सप्टेंबर महिन्यांत तिला पार्टटाईम जॉबच्या नावाने इंटाग्रामवरील काही पेजेसवर फॉलो करण्याचे काम देण्यात आले होते. त्यानंतर तिला ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले होते. त्यात तिला जास्त कमिशनचे गाजर दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तिने ३ लाख ३५ हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र तिला त्यांनी कमिशन दिले नाही किंवा तिचे गुंतवणुक केलेली रक्कमही परत केली नाही. या घटनेनंतर तिने मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in