डी. एन. म्हात्रे रोड पूरमुक्त करण्यात पालिकेला यश,परिसरातील नागरिकांना दिलासा

मुंबईत जोरदार पावसात पाणी साचण्याची ३८६ ठिकाणे होती.
डी. एन. म्हात्रे रोड पूरमुक्त करण्यात पालिकेला यश,परिसरातील नागरिकांना दिलासा

मुंबईत ३८६ फ्लडिंग पाॅईट्स असून त्यापैकी बोरिवली पश्चिमेकडील डी. एन. म्हात्रे रस्ता. परंतु मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाने या ठिकाणी असलेली पर्जन्य जल वाहिनी बदलून ४६५ मीटर अंतराची नवीन टाकण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेळीच निचरा होत आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात जलमय होणारा डी. एन. म्हात्रे रस्ता पूरमुक्त करण्यात पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाला यश आले आहे. यामुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत जोरदार पावसात पाणी साचण्याची ३८६ ठिकाणे होती. पैकी तब्बल २८२ ठिकाणांवर पाण्याचा निचरा करणाऱ्या उपाययोजना प्रशासनाने यापूर्वीच पूर्ण केल्या होत्या. तर उर्वरित १०४ पैकी यंदा ३१ मे २०२२ पूर्वी आणखी २४ ठिकाणांची कामे पूर्ण करण्यात आली. म्हणजेच आजवर ३०६ ठिकाणांची पावसाळी पाण्याच्या समस्येपासून सुटका झाली आहे. उर्वरित ८० ठिकाणची कामे २०२३ च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने कार्यवाही सुरु असून अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू पाहणी करुन सातत्याने या कामांचा आढावा घेत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in