दादर कबूतरखान्याजवळ पुन्हा राडा

दादरमधील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने बुधवारी आंदोलन केले. जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केली होती, याच वक्तव्याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्रमक होत निषेध नोंदवला. मात्र मराठा एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले असता पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दादर कबूतरखान्याजवळ पुन्हा राडा
Published on

मुंबई : दादरमधील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने बुधवारी आंदोलन केले. जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केली होती, याच वक्तव्याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्रमक होत निषेध नोंदवला. मात्र मराठा एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले असता पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दादर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. बुधवारी सकाळी ११ वाजल्यानंतर कबुतरखाना परिसरात आंदोलनकर्ते एकत्र व्हायला सुरुवात झाल्यानंतर आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोवर्धन देशमुख म्हणाले की, “जैन समाजाने ज्यावेळी चाकू, सुऱ्या घेऊन आंदोलन केले, तेव्हा पोलीस कुठे होते? आमच्या पाठिशी लोढांसारखे मंत्री नाहीत, हे आमचे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी आहेत. जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेतली तर महामोर्चा काढणार आहोत. हा विषय धर्माचा नसून आरोग्याचा आहे. काही जण कायदा आणि सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत, शस्त्रे काढू, मोर्चे काढू वगैरे भाषा करून असंतोष निर्माण करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा आम्हालाही प्रत्युत्तरादाखल मोर्चे काढावे लागतील.”

logo
marathi.freepressjournal.in