
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणी वाद शिगेला पोहोचला आहे. या प्रकारणी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी जमणार आहेत. मात्र, पोलिसांनी याला विरोध केला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
यासाठी कबुतरखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी १३ ऑगस्ट रोजी स्थानिक मराठी नागरिकांसह मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र येणार होते. तसेच यासाठी बुधवारी सर्वांनी दादरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यानंतर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.
कबुतरांना खाद्य देणे सुरूच
येथील एका इमारतीवर कबुतरांना दाणे टाकण्यात येत आहे, असा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.