दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई; साठवून ठेवलेले धान्य, दाणे जप्त; अनधिकृत कुंपण पालिकेने हटवले

शहराच्या विविध भागात असलेल्या कबुतरखान्यांमुळे नागरिकांना श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यावर याआधीच निर्बंध घातले होते. तरीही अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळताना दिसत नव्हते.
दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई; साठवून ठेवलेले धान्य, दाणे जप्त; अनधिकृत कुंपण पालिकेने हटवले
Published on

मुंबई : शहराच्या विविध भागात असलेल्या कबुतरखान्यांमुळे नागरिकांना श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यावर याआधीच निर्बंध घातले होते. तरीही अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळताना दिसत नव्हते. त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत कबुतरखाने बंद केले जाणार असल्याची घोषणा करताच पालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या वतीने दादर पश्चिम येथील कबुतरखान्यावर कारवाई केली.

दादरमधील कबुतरखान्यावर पालिकेने शुक्रवारी अचानक कारवाईचा बडगा उगारला. सकाळपासूनच पालिकेचे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि कबुतरांसाठी साठवून ठेवलेले सर्व धान्य, दाणे, पोते गाड्यांमध्ये भरून नेले. त्याचबरोबर स्थानिकांनी पालिकेच्या संरचनेवर अतिक्रमण करून बांधलेले शेड हटविले. कबुतरखान्याभोवती बांधलेल्या अनधिकृत कुंपणाचा काही भाग हटविण्यात आला. सध्या मुंबई पालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने आहेत. काही कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते. पण, हे कबुतरखाने पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कबुतरांना धान्य टाकणे थांबवावे यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेला एका महिन्यात कबुतरखाने बंद करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे आणि जनजागृती मोह[म सुरू करण्याचे निर्देश लवकरच दिले जातील, असेही सामंत यांनी सांगितले होते.

कबुतरखान्यामुळे या विभागात प्रचंड वाहतूककोंडी होत होती. रस्त्यावर थांबलेली माणसे, खाद्य घेऊन येणारे लोक, कबुतरांची गर्दी हे सगळं वाहतुकीसाठी मोठा अडथळा होता. त्यामुळे ही कारवाई आधीच करायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया या विभागात राहणाऱ्या सोहम घोले या तरुणाने दिली. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर कारवाई

पालिकेच्या वतीने शहरभर कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष जनजागृती व दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. फ्लेक्स व पोस्टर्सद्वारे जनजागृती, विशेषतः कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसनविकार, क्लॅमिडायोसिस यांसारख्या आजारांबद्दल जागृती केली जात आहे. तसेच कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. त्यासाठी सीसीटीव्हीमार्फत निरीक्षण करण्यात येणार आहे.

कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर कारवाई

logo
marathi.freepressjournal.in