
मुंबई : शिवडी नाका येथे स्वर्गीय निवांत घेरडे चौक निष्ठावंतांची भव्य दहिहंडी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी एकूण १०० पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी मानवी मनोरे सादर केले. या दहीकाला उत्सवासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी साहेब, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, नगरसेवक अनिल कोकीळ, स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक सचिन पडवळ, तसेच महिला उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, विधानसभा संघटक लताताई रहाटे तसेच शिवडी विधानसभेतील पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्या गोविंदा पथकांनी उपस्थिती दर्शिवली त्यांना रोख पारितोषिक तसेच चांदीचे नाणे देण्यात आले.