दहिसर-मुलुंड जॅम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण ;ठाकरे गटाच्या कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध गुन्ह्यांची नोंद

राहुल गोम्स हे शिवसेनेचे आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांचे जवळचे मित्र असल्याचे बोलले जाते.
दहिसर-मुलुंड जॅम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण ;ठाकरे गटाच्या कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध गुन्ह्यांची नोंद

मुंबई : दहिसर आणि मुलुंड येथील जॅम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीविरुद्ध अन्य एका गुन्ह्याची ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. राहुल गोम्स असे या कॉन्ट्रॅक्टरचे नाव असून त्यांच्या मालकीची ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे.

राहुल गोम्स हे शिवसेनेचे आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांचे जवळचे मित्र असल्याचे बोलले जाते. दहिसर आणि मुलुंड येथे जॅम्बो कोविड सेंटर उभारणसाठी महानगरपालिकेकडून ओक्स कंपनीचे मालक राहुल गोम्स यांना कंत्राट देयात आले होते. ऑक्टोबर २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत या जॅम्बो कोविड सेंटरसाठी भाडे म्हणून ३७ कोटींचे पेमेंट करण्यात आले होते. त्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने महानगरपालिकेला खोटी माहिती आणि बोगस कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. राहुल गोम्स यांनी मनपासह विक्रेत्यांच्या मदतीने कट रचून हा संपूर्ण आर्थिक घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले होते. अशाच प्रकारे त्यांच्या कंपनीने मनपाची ३७ कोटींची फसवणूक केली होती.

याप्रकरणी मनपाच्या सहाय्यक निरीक्षक शिल्पा ठेंगे यांनी ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर राहुल गोम्स यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या इतर संचालकाविरुद्ध कट रचून कोट्यवधी रुपयांच्या अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. लवकरच राहुल गोम्ससह इतर संचालकांची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in