दहिसर टोल नाका आता २० मीटर पुढे; वाहतूक सुरळीत झाल्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे.
दहिसर टोल नाका आता २० मीटर पुढे; वाहतूक सुरळीत झाल्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा
Published on

पूजा मेहता/मुंबई

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात बदलाची अपेक्षा होती.

गेल्या काही महिन्यांपासून सरनाईक नागरिकांना आश्वासन देत होते की, दहिसर टोल नाका हलवून मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील प्रचंड कोंडी कमी केली जाईल. यासाठी त्यांनी एमएसआरडीसी आणि एनएचएआयला वर्सोवा पुलाजवळ नवीन ठिकाणांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी टोल नाका वसई-विरार किंवा मीरा-भाईंदर हद्दीत हलवण्यास तीव्र विरोध केला.

logo
marathi.freepressjournal.in