कंपनीच्या ३६ लाखांवर डल्ला; अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

बोगस स्टेटमेंट तयार करून कंपनीच्या पैशांचा परस्पर स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्स्फर करून कंपनीची फसवणूक केली होती.
कंपनीच्या ३६ लाखांवर डल्ला; अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

मुंबई : सुमारे ३६ लाखांवर डल्ला मारणाऱ्या एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. बोगस बिल आणि बँक स्टेटमेंट सादर करून ही फसवणूक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सुजिथा मिलिंद लांबतुरे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीची रहिवाशी असलेली आयुशी सिंग ही एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिच्याकडे कंपनीच्या सर्व कायदेशीर बाबींची जबाबदारी आहे. नोव्हेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत सुजिथाने बोगस कागदपत्रे तयार करून त्यावरुन काही बिल पास करून कंपनीकडून पैसे घेतले. तसेच या पैशांचा परस्पर अपहार करून कंपनीची फसवणूक केली आहे, असे नमूद केले होते. या घटनेनंतर तिने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. गेल्या तीन ते चार वर्षांत सुजिथाने पास केलेल्या बिलाची तपासणी केली असता, त्याने बिल पास केलेले व्हेडर्स त्यांच्या पत्त्यावर मिळून आले नव्हते. त्याने बोगस स्टेटमेंट तयार करून कंपनीच्या पैशांचा परस्पर स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्स्फर करून कंपनीची फसवणूक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in